पनवेल वाहतूक पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम

नवी मुंबई (प्रतिनिधी)
दिनांक 15 मार्च रोजी पनवेल पोलिस वाहतूक शाखेच्या वतीने जुनी मुंबई पुणे हायवे कोलखे गाव येथे वाढत्या बाईक अपघाता दरम्यान विशेष जन जागृती करण्यासाठी अंदाजे 25 विना हेल्मेट बाईक स्वारांना एकत्र करून त्याना ब्लॅक स्पॉट असून गेल्या 3 वर्षात झालेल्या अपघातात मरण पावलेल्या लोकांची संख्या याबाबतची माहिती देऊन जण जागृति केली तसेच हेल्मेट परिधान करून आपला जीव वाचऊ शकतो,अशी विशेष जनजागृती मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत व नवी मुंबई पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व यावेळी सीट बेल्ट,ड्रिंक आणि ड्रायव्हिंग माहितीदर्शक बॉईस तसेच पलेक्सचा देखील वापर करण्यात आला
हेल्मेट, सीट बेल्ट का वापरावे या विषयी जनजागृती मुळे नागरिकांमध्ये बदल घडताना दिसून आले व नागरिकांने पनवेल वाहतूक पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले व इथून पुढे विना हेल्मेट बाईकवरून प्रवास करणार नाही असे नागरिकांनी अस्वासन दिले व ही चर्चा सर्व पनवेल शहरात पसरताच पनवेल करांनी आपल्या सेफ्टीसाठी हेल्मेट परिधान करणे,सीट बेल्ट वापरणे पसंद केले. व पनवेल वाहतूक पोलिसांनी केलेल्या कार्याचे सार्थक झाले अशी चर्चा नागरिकां मध्ये होत आहे.

