Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई

कोपरखैरणे (प्रतिनिधी)
कोपरखैरणे पोलिस वाहतुक शाखेकडुन वाहतुक सुरक्षा व नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच बरोबर विशेष मोहीम राबवुन वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात विशेष कारवाई देखील केली जाते. मार्च महिन्याचे पंधरवड्यात मा. पोलीस उपआयुक्त तिरूपती काकडे, वाहतुक, नवी मुंबई यांच्या संकल्पनेतुन व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात आल्या होत्या. या मोहीमेअंतर्गत कोपरखैरणे वाहतुक शाखेचे मा.. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे व त्यांच्या अधिनस्त पोलीस अमंलदार यांनी प्रभावी कारवाई केली. त्यात विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, नोपार्किग, कर्कश्या आवाजाचे सायलेन्सर इतर वाहतुकीचे नियम न पाळणे अशा एकुण 1476 वाहनांवर कारवाई करून 162450 रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर अशाच प्रकारे पुढील काळातही कारवाई करण्यात येतील अशी माहिती मा. सपोनि विश्वास भिंगारदिवे यांनी दिली.

Related posts

अकोले तालुक्यातील बेलापूर गावामध्ये थरारक कृत्य! भावाच्या अंत्यविधीचा खर्च दिला नाही म्हणून भाऊजयीसह दोघींची निघृण हत्या*

नेरुळ मध्ये अनाधिकृत बांधकामाचे वाढतेय पेव; नेरुळ विभाग कार्यालयातुन जाणून बुजून होतंय का दुर्लक्ष ?*

jantechasavdhanmaharashtra

जुन्नरच्या कन्येचा अटकेपार झेंडा!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment