Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

लालबाग राजा’च्या दरबारात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की

मुंबई : लालबागचा राजा मंडप  परिसर हे कायमच चर्चेत असते. गणोशोत्सवादरम्यान कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला कायमच पाहायला  मिळते.   लालबाग राजा’च्या परिसरात आज वार्तांकनासाठी गेलेल्या एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

 

‘लालबाग राजा’च्या परिसरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून माध्यम प्रतिनिधींना अरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे.  एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना निकम यांनी धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं सांगितलं. त्यावेळी या निकम यांनी “हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब” अशी गुंडगिरीची भाषा वापरली. निकम यांनी मास्क न घालता माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की केली आहे.

Related posts

चार महिन्यांपासून वाट चुकलेल्या वाटसरूला दिले मातेच्या हवाली.

jantechasavdhanmaharashtra

अकरा मुक्या जनावरांना जीवदान. ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी.

jantechasavdhanmaharashtra

*वाशी वाहतूक विभागाची विशेष मोहीम; २६५ वाहनचालकांवर कारवाई*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment