Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे पोलीसांनी पाईप चोरणाऱ्या टोळीस केली 24 तासात अटक

नवी मुबई (प्रतिनिधी)कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील आनंद भवन सोसायटी कोपरखैरणे सेक्टर 11 या ठिकाणी एम आय डी सी यांच्यामार्फत ड्रेनेज पाईप टाकण्यात येत होते परंतु रविवार असल्याने सदर ठिकाणचे काम बंद होते या संधीचा फायदा घेऊन आरोपी यांनी सदर साइटवर असलेले 1000 एम एम व्यासाचे सहा मोठे ड्रेनेज पाईप सात लाख रुपये किमतीचे पाईप दिनांक 15/09 /2021 रोजी दिवसा चोरून नेले सदर प्रकरणाची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर झाला सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक येवले यांच्या आधिपत्याखाली विशेष पथक तयार करून सदर पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपास करून चोवीस तासाच्या आत एकूण तीन आरोपी अटक करून गुन्ह्यातील सुमारे सात लाख रुपये किमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले सदर अटक करण्यात आलेले आरोपी मोहम्मद हबीब 53 अब्दुल रहमान खान 38आणि आक्तर मोहम्मद जफर खान47 या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कृषी उर्फ सोनू उर्फ काल्या राहणार मुंब्रा यांचा शोध घेण्यात येत आहे वरील आरोपीस दिनांक 07/09/ 2021 रोजी साडेदहा वाजता अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक 11/ 09/2021 रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह सह पोलीस आयुक्त श्री जय जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सुरेश मेंगडे सहा पोलीस आयुक्त विनायक वस्त वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे पोलीस स्टेशन प्रदीप तिदार पोलीस निरीक्षक गजानन कदम प्रशासन व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षक निलेश येवले व श्रीमती स्मिता पवार श्री गणपत पवार पोहवा श्री गणेश चौधरी पोना श्री किरण बुधवंत पोशी श्रीशंकर भांगरे गणेश गीते निलेश निकम अमोल भोसले यांनी अतिशय मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस अन्याची उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे कोपरखैरणे विभागात सर्वत्र पोलिस विभागाची केलेल्या कौतुकास्पद कामगिरी बदल चर्चा होत आहे

 

Related posts

नावि मुंबई मधे कोपरखैरणे पोलिसांची मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

jantechasavdhanmaharashtra

नशामुक्त नवी मुंबईअंतर्गत कोपरखैरणेत व.पो नि औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई*

jantechasavdhanmaharashtra

*लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment