Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजसंपादकिय

*नेरूळ पालिकेतील काही कर्मचारी व अधिकारी बनलेत का फेरीवाले व मार्जिन स्पेस चे ठेकेदार नागरिकांचा प्रश्न?*

*नेरूळ पालिकेतील काही कर्मचारी व अधिकारी बनलेत का फेरीवाले व मार्जिन स्पेस चे ठेकेदार नागरिकांचा प्रश्न?*

 

नवी मुंबईतील नेरुळ हे शहर विकसित मानले जात आहे इथे सुशिक्षित व दर्जेदार नागरिक राहत आहे पण रस्त्यावर फुटपाथवार व मार्जिन स्पेस वर मोठे प्रमाणात अनाधिकृत त व्यवसाय चालू झाले आहेत अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतरही पालिका फक्त कागदोपत्री कारवाई दाखवते पण आतापर्यंत ठोस कारवाई केलेली नाही यावरती स्थानिक नागरिकांच्या मते पालिका अधिकारी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असावे त्यामुळे अनधिकृत फेरीवाले फुटपाथ वरील व्यवसाय बंद होत नाही अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा मी कारवाई करत आहे पण ते पुन्हा पुन्हा बसत आहे तर काय करणार पण कुठेतरी आर्थिक व्यवहार होत आहे त्यामुळे ही ठोस कारवाई होत नाही भविष्यात या अनाधिकृत व्यवसायामुळे रस्त्यावर पेटणारा चुल्हा हा नागरिकांचा जीवावरही बेतू शकतो याचे अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे घेणेदेणे नाही अशी नागरिकांची चर्चा चालू आहे सकाळी उठून कामावर जाणारे अनेक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रोज रस्त्याने जा ये करत असतात कारण नेरूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि फुटपाथ वाले यांनी थैमान मानले आहे या सर्व गोष्टीला पालिका अधिकारी हेच आश्रय देत आहे अशी चर्चा नेरूळ मधील स्थानिक नागरिक करत आहे

*नागरिकांच्या मते नेरूळ मधील पालिका अधिकारी हे फेरीवाले व मार्जिन स्पेस यांचे ठेकेदारच बनले आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.*

*अनेक नागरिकांनी पालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे व अतिक्रमण विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल गेठे यांना माध्यमाद्वारे विनंती केली आहे की कधी थांबणार आमचा जीव घेणा प्रवास रोज कुटुंबाला सोडून नोकरी निमित्ताने रस्त्यावरून चालत जात असताना फेरीवाले गेस रस्त्यावरच पेटवत असतात कोणाचाही धक्का लागून अचानक स्फोट होऊन मृत्यूही होऊ शकतो किंवा मोठ्या प्रमाणात दुखापतही होऊ शकते आमचे कुटुंब आमच्या जबाबदारी वरती आहे आम्हाला जर काही झाले तर संपूर्ण कुटुंब आमचा रस्त्यावर येऊ शकते त्यामुळे आपणास विनंती आहे की हे कुठेतरी थांबवावे*

Related posts

अवैध / अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

jantechasavdhanmaharashtra

*विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सुरक्षा संदेश; सेवा सहयोगी ट्रस्टकडून ३०० हेल्मेटचे वाटप*

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

Leave a Comment