Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून मागितली खंडणी……*

*नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून  मागितली खंडणी……*

*नवी मुंबई पालिकेत RTI कार्यकर्ते व तक्रार करून खंडणी मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अधिकारी वैतागले…..*

*नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाला दुकाना विरोधात वारंवार नवी मुंबई मनपाला तक्रार करुन व्यवसायात अडचण निर्माण करू पाहणाऱ्या आणि या तक्रारी थांबविण्यासाठी खंडणी मागणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी किशोर लोंढे विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय…..*

*खंडणी बहाद्दर किशोर लोंढे हा शिवसेना ठाकरे गटाचा तुर्भे उपविभाग अध्यक्ष आहे. समाजसेवेच्या नावाखाली तक्रारी करुन खंडणी मागत फिरणारा या महाशयाने आता नवी मुंबईतील प्रसिद्ध मिठाई व्यवसायिकाकडे खंडणी मागत व्यवसायात प्रचंड अडचणी निर्माण करुन नवी मुंबईत राहणं मुश्किल करेन अशी धमकीच व्यापाऱ्याला दिली. धमकी देत 3 लाख रुपये आणि दरमहा 15 हजार रुपये खंडणी म्हणून मागत याने मिठाई व्यापाऱ्याला वेठीस धरले होते…..*

*यातील काही रक्कम व्यापाऱ्याने दिली मात्र एक रकमी हातात पैसे पाहिजे असे म्हणत व्यापाऱ्याला पुन्हा धमकी देऊ लागल्याने अखेर व्यापाऱ्याने कोपरखैरणे पोलीस स्टेशन गाठत खंडणीखोर किशोर लोंढे विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या खंडणीचा तपास करत आहे…..*

Related posts

कल्याणपूर्व येथील मनोज गुप्ता यांनी सामान्य नागरिकांची केली करोडो रुपयांची फसवणूक ! गुन्हा दाखल

jantechasavdhanmaharashtra

*विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सुरक्षा संदेश; सेवा सहयोगी ट्रस्टकडून ३०० हेल्मेटचे वाटप*

*मुंबई हादरली! 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; दादर रेल्वे स्थानकात…*

Leave a Comment