Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

*राजेंद्र बोडके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई अध्यक्ष पदी निवड*

*राजेंद्र बोडके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई अध्यक्ष पदी निवड*

नवी मुंबई प्रतिनिधी(साईनाथ शिंगोटे)

गेल्या १० ते १२ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून आपल्या निःस्वार्थ आणि परखड कार्यशैलीमुळे समाजमनावर आपला ठसा उमटवणारे एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजेंद्र बोडके यांनी जनतेच्या प्रश्नांना शासन-प्रशासनाच्या दरबारात पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य जे समर्पणाने केले, त्याचा परिणाम म्हणून आज हजारो सामान्य नागरिक त्यांना आपला विश्वासू प्रतिनिधी मानतात.

त्यांच्या पत्रकारितेतील निस्वार्थ कार्य, निर्भीडतेने प्रश्न मांडण्याची शैली आणि जनतेसाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय योगदान पाहता, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे आणि प्रदेश संघटक नितीन शिंदे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना *नवी मुंबई अध्यक्षपदाची* जबाबदारी सोपवली. हे केवळ एक पद नाही, तर त्यांच्या कार्याला मिळालेला मोठा सन्मान आहे.

या निवडीबद्दल नवी मुंबईतील अनेक प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि पत्रकार बंधूंनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या मनोगतात राजेंद्र बोडके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पत्रकारिता करताना अनेक आव्हाने येतात, शासन आणि प्रशासनाचा दबावही अनेकदा सहन करावा लागतो. पण अशा कठीण प्रसंगी पत्रकार एकटे पडू नयेत, म्हणूनच मी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना पाठबळ देण्याचे कार्य करणार आहे. अन्याय झालेल्या पत्रकारांसाठी मी नेहमी उभा राहीन आणि त्यांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम करीन.”

ते पुढे म्हणाले, “पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद व्हावा आणि पत्रकारितेचा खरा हेतू – म्हणजे लोकशाहीची चौथी स्तंभ म्हणून भूमिका बजावणं – हे जपण्यासाठी मी निस्वार्थ भावनेने काम करणार आहे.” आणि लवकरच नवी मुंबई मधील संघटनेची कमिटी स्थापन करून अनेक ज्येष्ठ व तरुण पत्रकारांना संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे

संघटनेचे प्रदेश संघटक नितीन शिंदे यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “राजेंद्र बोडके हे एक अभ्यासू, कर्तबगार आणि नितळ मनाचे व्यक्तिमत्त्व आहे. ते केवळ पत्रकार नाहीत, तर पत्रकारांच्या समस्यांवर उपाय शोधणारे नेतृत्वही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवी मुंबईतील पत्रकारांना केवळ न्यायच मिळणार नाही, तर संघटनेची ताकदही वाढणार आहे.”

कोकण विभागीय संघटक अरुण बिराजदार यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “राजेंद्र बोडके यांचे कार्य मी स्वतः जवळून पाहिले आहे. ते प्रसंगी लढवय्ये असतात, प्रसंगी समंजस. त्यांनी नवी मुंबईतील पत्रकारितेला जी दिशा दिली आहे, ती खरोखर अविस्मरणीय आहे. म्हणूनच ही जबाबदारी त्यांनी पूर्ण ताकदीने पार पाडतील, याची मला पूर्ण खात्री आहे.”

*जनतेचा सावधान महाराष्ट्र* वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक पुंडलिक काणगुडे यांनी सांगितले की, “राजेंद्र बोडके हे लढाऊ स्वभावाचे, प्रामाणिक आणि स्वच्छ नजरेने समाजाकडे पाहणारे पत्रकार आहेत. कोणताही राजकीय वा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता त्यांनी नेहमीच सामान्य माणसांच्या बाजूने उभं राहत पत्रकारितेचं खरं स्वरूप टिकवून ठेवलं आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे नवी मुंबईतील पत्रकारांना एक प्रेरणादायी मार्गदर्शक मिळाला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”

**या सगळ्या गौरवाच्या पार्श्वभूमीवर, राजेंद्र बोडके हे केवळ एक पत्रकार नाहीत, तर पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासासाठी अनेकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत.**

Related posts

तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक!

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे पोलिसांची साखळी चोरी प्रकरणात मोठी कामगिरी — ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

रस्ता सुरक्षा सप्ताह2024 अंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे नागरिकांना मार्गदर्शन

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment