Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

*शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड*

**शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड*

*पुणे :*
पुरोगामी विचारांचा वसा आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक व सर्वमान्य नेते मा. शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. पक्षाच्या विविध पातळ्यांवर सातत्याने कार्य करणाऱ्या शिंदे यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

या नव्या नियुक्तीबद्दल शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आदरणीय पवार साहेब, जयंतराव पाटील आणि पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाचे नेतृत्व आणि सर्व कार्यकर्तेच माझे खरे नेते आहेत, हे ध्यानात ठेवून पक्षाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेईन,” असे त्यांनी सांगितले.

शशिकांत शिंदे यांनी जावळी मतदारसंघापासून आपला राजकीय प्रवास सुरू केला असून, पक्षाच्या विविध आंदोलने, संघर्ष व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा उच्च मूल्यांकन करून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षाच्या संकट काळात ७ वर्षे धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “पाटील साहेबांनी पक्षनिष्ठेचा वस्तुपाठ घालून दिला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाचा मी सन्मान राखेन.”

शिंदे यांनी आपल्या निवेदनात नवा युवा नेतृत्वाचा पाया घालण्याचे संकेत देत सांगितले की, “पक्षाला नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी मी पूर्ण निष्ठा आणि आत्मीयतेने पार पाडेन. माझी निष्ठा कायमच शरदचंद्रजी पवार साहेबांच्या चरणाशी राहिल.”

या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला महाराष्ट्रात नव्या जोमाने बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया विठ्ठल अण्णा मोरे नवी मुंबई कोपरखैरणे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

 

Related posts

*सिडकोची घरे १० टक्क्यांनी स्वस्त; १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर*

jantechasavdhanmaharashtra

अवजड वाहतूक उद्यापासून बंद?; ठाणे-नवी मुंबईतील निर्बंधांचा व्यवसायाला फटका

jantechasavdhanmaharashtra

*मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारवर वाशी पोलिसांचा छापा! महिला वेटरसह ५ जण ताब्यात*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment