Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*दशरथ भगत यांच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन*

दशरथ भगत यांच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन

नवी मुंबई – राज्याचे वनमंत्री व लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रमांचा भव्य पंधरवडा साजरा केला जाणार आहे. १५ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान विविध शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक आणि सेवाभावी असे शंभर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दशरथ भगत यांनी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या उपक्रमांचे संयोजन भाजप युवा नेते निशांत भगत करीत असून कार्यक्रमांचे स्थळ, उपक्रमांचे स्वरूप याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमात प्रभाग क्र. ६५, ७७ आणि ७८ मधील माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत, रुपाली निशांत भगत तसेच स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतक यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे.

कार्यक्रम समन्वयक संदीप भगत यांनी सांगितले की, वाशीगाव, सानपाडा-पामबीच, जुईनगरसह नवी मुंबई व ठाणे-पालघर जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते मिळून लोकसहभागातून हे सर्व उपक्रम आयोजित करणार आहेत.

या पंधरवड्यात ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, डॉक्टर्स, खेळाडू, माजी सैनिक, महिला मंडळे, बचत गट, महिला रिक्षा चालक, शासकीय आस्थापना, धार्मिक संस्था, वारकरी मंडळे, पर्यावरण संवर्धक, रुग्णसेवा संस्था, दिव्यांग विद्यार्थी व योगा प्रशिक्षक अशा विविध घटकांचा सहभाग राहणार आहे.

दशरथ भगत यांनी सांगितले की, “गणेश नाईक यांच्या अखंड जनसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी शंभर सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम हा एक सामाजिक उत्सव ठरेल.

Related posts

नवी मुंबई म्हापे ते शीलफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिक ला सामोरे जावे लागते

25 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्च्या APMC हद्दीत मुक्कामी असल्या मुळे वाहतुकीत बद्दल

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना टोला.!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment