Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने लग्न सोहळ्यात कन्यादानाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 07,53,100 रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटना 2 नोव्हेंबर 2025 रोजी ऐरोली सेक्टर 15 येथे लेवा पाटीदार समाज हॉलमध्ये फिर्यादी शकुंतला प्रसाद यांच्या मुलीच्या लग्नावेळी घडली. स्टेजवर ठेवलेल्या पर्समधून सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण, 2 लाख रुपये रोख, तसेच आयफोन 17 प्रो आणि आयफोन 11 असे एकूण 08,53,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 780/25 बी.एन.एस कलम 305 नुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले असता दोन संशयित व्यक्ती तसेच त्यांच्या वापरातील स्विफ्ट कार दिसून आली. तपासातून गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता आरोपी मध्यप्रदेशातील कडिया सान्सी, जिल्हा राजगड येथील गुन्हेगार मंडळी असल्याची खात्री पटली. तत्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाने मध्यप्रदेशात रवाना होऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने 5 दिवस तपास केला. अखेर महिला आरोपी अंजली प्रदीप दपानी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित आरोपी अरुण उर्फ वरून बालेरिया, मानव सिसोदिया आणि प्रदीप जमुनादास सिसोदिया हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही टोळी लग्नसमारंभ, मेळावे आणि गर्दीच्या कार्यक्रमांत हेरगिरी करून मौल्यवान वस्तू चोरी करणारी असून, या प्रकरणात पोलिसांनी तत्पर आणि अचूक तपास करून टोळीचा पर्दाफाश केला आहे.

कारवाईत सपोनि अविनाश पाळदे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा प्रसाद वायंगणकर, पोना विजय करंकाळ, पोना प्रल्हाद जाधव, पोशि प्रविण भोपी, पोशि अभिजीत राळे आणि पोशि राजेश तडवी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या प्रभावी तपास कार्याचे समाजातून विशेष कौतुक केले जात आहे.

Related posts

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि. ठाणे शाखा नुतन वास्तूत स्थलांतर सोहळा

jantechasavdhanmaharashtra

अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच आमची ओळख. !! टायगर ग्रुप संस्थापकअध्यक्ष-तानाजी जाधव

jantechasavdhanmaharashtra

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment