Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*सानपाडा सेक्टर २ मध्ये आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य वर्धिनी पोर्टा केबिन केंद्रास शासन मान्यता समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश*

*सानपाडा सेक्टर २ मध्ये आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य वर्धिनी पोर्टा केबिन केंद्रास शासन मान्यता समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश*

Oplus_16908288

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबईतील सानपाडा विभागासाठी आरोग्य क्षेत्रात दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून सेक्टर २ येथील मनपा भूखंड क्रमांक १३ वर केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना अंतर्गत आरोग्य वर्धिनी पोर्टा केबिन केंद्र स्थापन करण्यास शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सदर प्रस्ताव समाजसेवक निलेश कचरे यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात मांडण्यात आला होता. त्यानंतर आरोग्य विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात येऊन प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुढील एक महिन्यात पोर्टा केबिन उभारणी पूर्ण करून केंद्र नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

या केंद्रामार्फत सानपाडा परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासण्या, माता-बाल आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक सल्ला, नियमित औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ स्थानिक स्तरावर मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ कमी होऊन आरोग्यसेवा सुलभ व प्रभावी होणार आहे.

या प्रकल्पास मंजुरी मिळवून देण्यात समाजसेवक निलेश सोमाजी कचरे यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे. सानपाडा विभागातील आरोग्य सुविधांच्या अभावाची जाणीव ठेवून त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला, संबंधित प्रशासनाशी समन्वय साधला आणि लोकप्रतिनिधींशी संवाद ठेवत विषय शासनस्तरावर पोहोचविला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून व जनसेवेच्या भूमिकेतून केलेल्या प्रयत्नांमुळेच या केंद्रास अंतिम मान्यता मिळाल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे.

सानपाडा विभागाच्या आरोग्य सुविधा बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय टप्पा ठरणार असून समाजसेवक निलेश कचरे यांच्या प्रयत्नांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. लवकरच केंद्र सुरू होऊन सर्वसामान्यांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related posts

*महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध! वनमंत्री गणेश नाईक*

*कोपरखैरणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; वाहनचोराच्या मुसक्या आवळत २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

म्हसवंडी गावात पडला दरोडा!! एकाच वेळी फोडली 7 घरे…*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment