Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

ऑपरेशन ऑल आउट दरम्यान नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर पंच, तब्बल ३९० जणांवर कारवाई

बेकायदेशीर कृत्य कमी होत नसल्याने तुर्भे, सानपाडा, नेरूळ, एन आर आय, सीबीडी या पाच पोलीस ठाण्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवून एकूण ३९० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई : (प्रतिनिधी) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार गेल्या महिन्याभरापासून विविध पोलीस ठाण्यात ऑलआऊट ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्यांना लगाम घालून आरोपींची धरपकड सुरू आहे. तरी देखील बेकायदेशीर कृत्य कमी होत नसल्याने तुर्भे, सानपाडा, नेरूळ, एन आर आय, सीबीडी या पाच पोलीस ठाण्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवून एकूण ३९० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांच्या पोलीस खात्यातील कार्याचा अनुभव या ठिकाणी कामी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विविध दिवशी विविध पोलीस ठाणे हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृतींना आळा घालून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याच्या कारवाईचा प्रयत्न सुरू आहे. त्याला यश देखील प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.
दिनांक २६ ते दिनांक २७ एप्रिल रोजी तुर्भे, सानपाडा, नेरूळ, एनआरआय, सीबीडी या पाच पोलीस ठाण्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवून दारूबंदी, अमली पदार्थाचे सेवन, हत्यार कायदा, कोपता कायदा, मद्यपान करून वाहन चालवणे, ज्वालाग्रही पदार्थांबाबत हयगय करणे, सार्वजनिक मार्गावर धोका निर्माण करणे तसेच वाहतूक कायदा अशा विविध कायदा अंतर्गत तब्बल ३९० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील अशा प्रकारच्या कारवाया करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

jantechasavdhanmaharashtra

सीबीडी पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती व हत्यारांबाबत मार्गदर्शन

*कोपरखैरणे पोलीस ठाण्यांतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment